fbpx

मुंबईत हाय अलर्ट : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळण्यात येणार

मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा- सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळण्यात येणार असल्याचे सूत्राकडून समजते.

बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून सर्वपक्षीय बैठकीबाबत कळविले. मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनाही विधानभवनात पाचारण करण्यात आले होते. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली.

अधिवेशनामुळे विधान भवन परिसरात मोठा बंदोबस्त आहे. शिवाय अधिवेशन काळातील मोर्चांमुळे आझाद मैदान परिसरातही पाच ते सहा हजार पोलीस अडकून पडले आहेत. पोलिसांवरील हा ताण पोलीस अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली.