मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवणार ?

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. एका वृत्त वाहिनीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळतिये .मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या जागी कृपाशंकर सिंग किंवा भाई जगताप यांची निवड होण्याची चर्चा आहे.

बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून बाहेर आल्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबईत मराठी अध्यक्ष देण्यासाठी काँग्रेसमधील एक गट आग्रही असल्याचं म्हटलं जातं.काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती झाल्यानंतर संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. याच अंतर्गत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निरुपम यांना दूर करण्यात येणार असल्याचं बोललं जातं.

राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून पक्षसंघटन पातळीवर अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन हे सर्व निर्णय घेण्यात येत आहेत. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मराठी माणसाकडे दिल्यास त्याचा कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेस असा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेसच्या फेरीवाला मोर्चावर मनसेकडून बटाटे फेक

कॉंग्रेसच्या फेरीवाला मोर्चावर मनसेकडून बटाटे फेक