‘पकोडा आंदोलन’; संजय निरुपमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना रोजगारासंदर्भात भजी (पकोडा) तळण्याचा सल्ला दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गिरगाव चौपाटीवर काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पकोडा निषेध आंदोलनात सहभागी झालेले काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पकोड्याचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली होती.