मनसे हा कोणताही विचार नसलेला पक्ष; कॉंग्रेस-मनसे युतीचा प्रश्नच नाही – निरुपम

मुंबई: मनसे हा कोणताही विचार नसलेला पक्ष आहे. त्यांच्याकडून केवळ जातीयतेढ निर्माण करण्याच काम केल जात त्यामुळे भविष्य काळात मनसेशी युती करणार नसल्याच वक्तव्य मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता येत्या काळात दोन्ही कॉंग्रेस आणि मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, कॉंग्रेस केवळ समविचारी पक्षाशी आघाडी करते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे युतीच्या केवळ अफवा आहेत. या चर्चेचे मी खंडन करत असल्याचही निरुपम म्हणाले आहेत.