कार्यकर्त्याला गावात बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! सांगून मेळाव्याला गर्दी जमवा- दानवे

रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना भाजप मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी दिले अजब सल्ले

औरंगाबाद: भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने ६ एप्रिलला मुंबईत बांद्रा-कुर्ला मैदानावर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी अजब सल्ले दिले आहेत. त्यामुळे कोणी त्यांच्यावर टीका करत आहे तर कोणी खिल्ली उडवत आहे.

दानवे म्हणाले, मेळाव्यासाठी गर्दी जमवण काही अवघड आहे का? असा सवाल करतांनाच गावात बिडी फुकत बसलेल्या कार्यकर्त्याला मुंबईला फुकट जायच, फुकट यायंच सांगा. त्याला म्हणा इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! पहा हा फॉर्म्युला वापरून! , असा अजब सल्ला रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

You might also like
Comments
Loading...