महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबई भाजपा महिला शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली

भगतसिंह

मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.महाविकास आघाड़ी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याबाबत राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांना अवगत केले.

या बरोबरच या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. यात  महाराष्टात शक्ति कायदा लागू केला जावा. महाराष्ट्र सरकारने विशेष विधानसभा सत्र आयोजित करुन शक्ती कायदा लवकरात लवकर पास करावा. मुंबई मधील साकीनाका येथे झालेल्या निर्घृण गुन्ह्यातील बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी दिली जावी. तसेच, भाजपा शासन काळात कार्यान्वित केलेली  CCTV कार्यप्रणाली अधिक सृढृढ़ केली जावी अशी मागणी केली आहे.

या महिला शिष्टमंडळात मुंबई भाजपाच्या महिला प्रतिनिधी, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार भारती लवेकर, शलाका साळवी, मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा शीतल गंभीर, मुंबई भाजपाच्या मिडिया प्रभारी श्वेता परुळकर, मुंबई भाजपा युवती प्रमुख पल्लवी सप्रे यांच्या सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या :