जखमींना भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांनी ओलांडली असंवेदनशीलपणाची सीमा

किरीट सोमैया

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईच्या मुलुंडमध्ये बिबट्याने ३ जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मुलुंड मध्ये मध्यरात्री बिबट्या एका इमारतीत घुसला होता. त्यावेळी हा प्रकार घडलाय.

यात विशेष बाब म्हणजे स्थानिक खासदार किरीट सोमैया हे जखमींना भेटायला गेले असता त्यांनी असंवेदनशीलपणाची सीमा ओलांडली आहे. किरीट सोमैयांनी चक्क जखमींबरोबर सेल्फी काढलेत.. लोक जखमी झालेत, अशा वेळी सेल्फी काढू नये, इतकी साधी गोष्ट खासदाराला कळत नाही का अशी टीका आता खासदार किरीट सोमैयांवर होत आहे.