आरोग्यम धनसंपदा ! – बहुपयोगी कोकम

टीम महाराष्ट्र देशा : कोकममध्ये लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ व "क" जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. तर अनेक आजार बरे कण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे.

उपयोग
१. कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
२. अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
३. हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे, ओठ मऊ होतात.
४. कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
५. कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.