Share

Amey Khopkar | “मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करतात”; अमेय खोपकर यांचे खोचक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा: गोदावरी (Godavari) आणि सनी (Sunny) हे मराठी चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून हे चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचत आहेत. या दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. अशात सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी या चित्रपटांचे शो कमी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करताय, असे म्हणत अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.

अमेय खोपकर (Amey Khopkar) यांचे ट्विट

आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला ‘गोदावरी’ आणि प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचत असलेला ‘सनी’ या दोन्ही चित्रपटांची शोज सोमवारी कमी झाले आहे, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणे हे गरजेचे आहे. सनी या चित्रपटाला किती गर्दी होते सोशल मीडियामधील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतय. असं असूनही मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करताय, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे.

अमेय खोपकर यांनी मीडियाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, त्यांनी काही मल्टिप्लेक्सच्या प्रमुखांना फोन केला होता. त्याचबरोबर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की ही नाटकं चालणार नाही. सनी आणि गोदावरी या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर या दोन्ही चित्रपटांचे शो हाऊसफुल आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचे शो सोडून काय साउथ सिनेमांची शो लावायचे आहेत का? त्याचबरोबर ते म्हणाले की,”मला प्रेक्षकांना सांगायचे आहे हिंदी आणि इतर सिनेमे थेटरमध्ये जाऊन बघतात त्याचबरोबर मराठी सिनेमेसुद्धा टीव्हीवर प्रदर्शित होण्याची वाट न बघता सिनेमागृहात जाऊनच बघा.”

सनी हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. अभिनेता ललित प्रभाकर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर, गोदावरी हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने आणि विक्रम गोखले इत्यादी कलाकार दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

टीम महाराष्ट्र देशा: गोदावरी (Godavari) आणि सनी (Sunny) हे मराठी चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून हे चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचत …

पुढे वाचा

Entertainment Politics

Join WhatsApp

Join Now