मृत्यूच्या अफवांविषयी तालिबानच्या मुल्ला बरदारने दिले स्पष्टीकरण

bardar

अफगाणिस्तान : हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी याच्याशी सत्ता संघर्षात तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदारचा मृत्यू झाल्याची अफवा मागील काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु या अफवांसंदर्भात स्वतः बरदारनेच स्पष्टीकरण दिले आहे. त्याने एका ऑडिओ मेसेज द्वारे आपण जिवंत आणि ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. तसेच मृत्यूचे वृत्त बनावटी असल्याचेही त्याने सांगितले आहे.

मागील दोन दिवसांपासून बरदार हा राष्ट्रपती भवनात प्रतिस्पर्धी तालिबानी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्यावर उत्तर देत बर्दर्न आपल्या ऑडिओ संदेशात म्हंटले आहे की,’गेल्या काही रात्री, मी सहलींवर गेलो आहे. सध्या मी जिथे आहे तिथे आम्ही सर्व ठीक आहोत, माझे सर्व भाऊ आणि मित्र सर्व ठीक आहोत.मीडिया नेहमी खोटा प्रचार प्रकाशित करते. म्हणून, ती सर्व खोटे धैर्याने नाकारा, आणि मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की आम्हाला कोणतीही समस्या नाही’.

तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याचाही बऱ्याच वर्षांपासून मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. यापूर्वी गटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी तो कंदहारमध्ये उपस्थित होता. दरम्यान, बरदारची ही ऑडिओ क्लीप खरी आहे की खोटी यासंदर्भात पडताळणी सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या