ज्याने स्वतःच्या बापाला धोखा दिला तिथ दुसऱ्यांच काय होणार ? – मुलायम

लखनऊ : मुलायम सिंह यादव यांनी आज स्पष्ट केल आहे की ते नवीन पक्षाची स्थापना करणार नाहीत. तर दुसरीकडे मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना आशीर्वाद देत टीका सुधा केली आहे. अखिलेश हा माझा मुलगा आहे त्यामुळे माझा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे , परंतु त्याच्या निर्णयाशी मी सहमत नाही, त्याच्या कोणत्या निर्णयावर मी खुश नाही याचा खुलास लवकरच करणार असल्याच नेताजींनी सांगितलय.

“अखिलेश याने मला शब्द दिला होता की मी ३ महिने अध्यक्ष पदावर राहीन आणि नंतर तुम्हाला पद परत करेल , त्यामुळे जो आपल्या शब्दाला जागत नाही तो यशस्वी होणार नाही. तसेच ज्याने स्वतःच्या बापाला धोखा दिला तिथ दुसऱ्यांच काय होणार”? अशी तळमळ सुधा मुलायम सिंह यादव यांनी बोलून दाखवली.

अनेक दिवसांपासून मुलायम सिंह यादव हे नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याच्या बातम्या येत होत्या पण पुत्रप्रेमापोटी मुलायम सिंह यादव ही घोषणा करू शकले नाहीत. तर दुसरीकडे ही पत्रकार परिषद पाहत असणाऱ्या अखिलेश यादव यांनी ट्विट करून नेताजींचा जयजयकार केलाय.