मुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट

टीम महाराष्ट्र देशा – पुणे शहरातील कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक यांचा ५० हजार मतांनी विजय होणार असा विश्वास पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. गिरीश बापट यांनी मुक्ता टिळक या ५० हजार मतांनी निवडून येणार असे फळ्यावर लिहून ठेवले आहे.

कसबा मतदारसंघातून २०१४ ला गिरीश बापट यांनी विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची लोकसभेत वर्णी लागल्याने कसब्यातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून मुक्ता टिळक मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा बापट यांना विश्वास आहे.

दरम्यान पुण्यात खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर लावलेले पाहायला मिळाले आहेत. निकाल जाहीर होण्याआधी हे पोस्टर्स लावले असल्याने जर दोडके यांच्यासाठी सकारात्मक निकाल लागला नाही तर मात्र त्यांचे हसू होण्याची शक्यता आहे. दोडके यांचा सामना भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याशी होत आहे.

सचिन दोडके यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन शिवाजीराव दोडके यांची आमदार पदी प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर छापण्यात आहे. तसेच मागे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या