मुक्‍ता दाभोळकर, आव्‍हाड निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा

टीम महाराष्ट्र देशा– राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर, अजित पवार आणि रितू राज यांचा देखील समावेश होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याने एटीएसच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याची आणि सीबीआय कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची समोरसमोर चौकशीसाठी सीबीआय प्रयत्न करतेय. सीबीआयनं मुंबईतील सेशन्स कोर्टाकडे यासाठी परवानगी मागितली आहे.

काल पुणे सीबीआय कोर्टाने अंदुरेची पोलीस कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. तर मुंबई सेशन्स कोर्टाने शरद कळसकरची पोलीस कोठडी ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली. पण डॉक्टर दाभोलकर हत्याप्रकरणी त्याचा ताबा सीबीआयला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कळसकरला पुण्याला नेणं शक्य नसल्यानं आता अंदुरेला मुंबईत आणून कळसकरसोबत समोरासमोर चौकशी करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ही परवानगी सीबीआयकडून कार्टाकडे मागण्यात आली आहे.

कोर्टाने एटीएसला फटकारले

गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांड पासून एटीएसने केला आहे. मग अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केले, असा सवाल करत न्यायालयाने एटीएसला फटकारले आहे. तसेच अविनाशच्या तपासाबाबत योग्य उत्तर देण्यास एटीएसला २ तासांचा वेळ दिला.

2 Comments

Click here to post a comment