‘अजुनही बरसात आहे’ द्वारे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत पुन्हा छोट्या पडद्यावर

मुंबई : सोनी मराठी या वाहिनीवर नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी मराठी प्रेक्षकांसाठी मिळत असते. या वाहिनीने सुरुवातीपासुनच प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान सोनी मराठी प्रेक्षकासाठी ‘अजुनही बरसात आहे’ ही एक नविन कलाकृती घेऊन येत आहे.

अजुनही बरसात आहे या मालिकेद्वारे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत पुन्हा एकदा एकत्र येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडीयावर प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची एका वधु-वर सुचक मंडळसमोर भेट होते. यावेळी फोनवर बोलताना मुक्ता समोरुन येणाऱ्या उमेश कामतला टाळण्याचा प्रयत्न करत असते यादरम्यान तिचा फोन खाली पडतो. नेमका उमेश कामत तो फोन उचलतो आणि त्यांची नजरा नजर होते.

यानंतर दोघात होणाऱ्या संवादाने समजते की दोघेही विवाह संस्थेत नाव नोंदणीसाठी आलेले असतात. इतक्याच पाऊस सुरु होतो आणि उमेश कामत मुक्ताला म्हणतो की, ‘बेस्ट पेक्षा बेटर काही नसत’ आणि निरोप घेतो. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट असा संवाद कानावर पडतो. येत्या १२ जुलै पासुन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील मुक्ताचे नाव मीरा आणि उमेशचे नाव आदित्य असे आहे. प्रेमरंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP