मरकज कार्यक्रमाच्या आयोजकांवर मुख्तार अब्बास नक्वी भडकले, म्हणाले…

नवी दिल्ली : दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीग ए जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी मकरज हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संताप व्यक्त केला आहे. तबलिगी जमातच्या बेजबाबदार वागण्यामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनी टीका करताना तबलिगी जमातचा हा तालिबानी गुन्हा आहे. त्यांचा हा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही असं म्हटलं आहे.

नकवी यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा. हा बेजबाबदारपणा नाही तर गंभीर गुन्हा आहे. जेव्हा संपूर्ण देश एकत्र होऊन करोनाशी लढा देत आहे तेव्हा अशा गंभीर गुन्ह्याला माफी दिली जाऊ शकत नाही”.