देश टिळा-टोपीच्या राजकारणावर चालत नाही ; नक्वी यांची राहुल गांधींवर आगपाखड

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष रोज नवे-नवे प्रयोग करत आहे. पण, यामुळे तेच उघडे पडत आहेत. काँग्रेस अध्यक्ष कधी टिळा लावून घेतील, कधी टोपी घालतील. पण, देश टिळा आणि टोपीच्या राजकारणावर चालत नाही, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेश दौर्यावर केली आहे.

धर्म आपल्या ठिकाणी आहे. राहुल गांधींनी त्यांचे धोरण, कार्यक्रम काय आहे, हे सांगायला हवे. तुम्ही कोणती नीती आणि कार्यक्रम घेऊन देशातील लोकांमध्ये जात आहात? पण, ते सध्या भ्रमित आहेत. राहुल गांधींची जी कार्यशैली आहे, ती भाजपची कधीच राहिलेली नाही. मंदिर, मशीद, गुरुद्वारा हे श्रद्धेचे केंद्र असून, ते राजकारणाचे केंद्र नसल्याचे नक्वी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणजे नरेंद्र मोदी समोर नाल्यातील किड्याप्रमाणे – केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

You might also like
Comments
Loading...