fbpx

प्रणव मुखर्जी उद्या करणार संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी उद्या मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात पोहोचणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता त्यांचे नागपुरात आगमन होईल. ते उद्या स्वयंसेवकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी मुखर्जी यांनी देखील मला काय बोलायचं आहे ते मी थेट नागपुरातच बोलेलं असं सांगितले होते. दरम्यान आता प्रणव मुखर्जी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.