महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण

mukesh khanna

मुंबई : अभिनेते मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शिर्षकावर आक्षेप घेतला होता. याआधीदेखील हे सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कपिल शर्मा शोवर टीका करत शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला होता. हे सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता मुकेश खन्ना यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते मीटू चळवळीवर बोलताना दिसतले.

सध्या ट्विटरवर मुकेश खन्ना यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून. या व्हिडीओमध्ये ते महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात असे आहे. ‘महिलांचे काम आहे घर सांभळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधी पासून सुरु झाली जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केली’ असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी, ‘आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करतात. पण मी तुला सांगू इच्छितो की समस्या इथूनच सुरु होतात. सर्वात पहिले याचा परिणाम कोणावर होत असेल तर घरातील लहान मुलांना. त्यांना आईचे प्रेम मिळत नाही’ असे म्हटले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केले जात होते.

आता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. यात अभिनेते म्हणाले की, जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो केवळ एक भाग आहे आणि त्या आधारावर चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ते महिलांचा खूप सन्मान करतात.

मुकेश खन्ना यांनी लिहिले की, ‘मला खरंच आश्चर्य वाटतं की, माझ्या एका वक्तव्याला फारच चुकीच्या पद्धतीने सादर केलं जात आहे. मी महिलांविरोधात असल्याचं दाखवलं जात आहे. जेवढा सन्मान मी महिलांचा करतो तेवढाच कदाचितच कुणी करत असेल. त्यामुळेच महिला लक्ष्मी बॉम्बच्या नावाचा विरोध केला. मी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. प्रत्येक रेप कांडावर विरोधात मी बोलत आहे. मी हे कधीच बोललो नाही की, महिलांनी काम करू नये. मी फक्त हे बोललो होतो की, मीटू ची सुरूवात कशी होते. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. मग मी महिलांच्या काम करण्याविरोधात कसं बोलू शकतो. त्या व्हिडीओत मी केवळ महिलांनी बाहेर जाऊन काम केल्याने काय समस्या होऊ शकते यावर प्रकाश टाकत होतो.

महत्वाच्या बातम्या