अबब… दोन दिवसांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत २९ हजार कोटींची वाढ

टीम महाराष्ट्र देशा: देशावर आर्थिक मंदीचे सावट असल्याचं अनेक तज्ञाकडून सांगण्यात येत आहे, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजार देखील गडगडला आहे. बाजारात मोठी घसरण सुरू असताना देखील रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दोन दिवसांत 29 हजार कोटींची वाढ झाली आहे. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रिजच्या सर्वसाधारण बैठकीत अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या होत्या, त्यामुळे कंपनीच्या शेअरर्समध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोमवारी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या वार्षिक बैठकीत सौदीतील तेल कंपनी अरामकोला 20 टक्के शेअर विक्री, पुढील महिन्यात जिओ फायबर लाँच करणे, तसेच 18 महिने कंपनीनं स्वतःला पूर्णतः कर्जमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनांचे शेअर बाजाराकडून स्वागत करण्यात आल्याचं दिसतय.

Loading...

जागतिक स्थरावर अमेरिका – चीनमध्ये ताणले गेलेले व्यापारी संबंध, देशातील ऑटो मोबाईल इंडस्ट्रीत आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे, तर दुसरीकडे रिलायन्स कंपनीच्या शेअरर्समध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे मुकेश अंबानी यांना तब्बल 28 हजार 684 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

मुकेश अंबानी हे सध्या जगातील तेरावे तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्त आहेत. त्यांची एकूण संपत्ती 49.9 अरब डॉलर एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?