अंबानींकडून जीओच्या ग्राहकांसाठी घोषणांचा पाऊस; नेमकं काय आहे अंबानींच्या पेटाऱ्यात वाचा

टीम महाराष्ट्र देशा : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या बैठकीत (Jio GIGA TV ) लाँच केला आहे. तसंच रिलायन्स जिओचा नवा फोनही आता लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर 15 ऑगस्टपासून Jio फोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप चक्क फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. ही घोषणा मुंबईतील बिर्ला मातोश्रीवर वर त्यांनी केली. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ 2 फोन लाँच केला. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध असेल. जिओ फोन 2 सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात आलं.

यावेळी मुकेश अंबानी यांनी महत्त्वाची गिगा टीव्हीबाबतची घोषणा केली. शिवाय गिगा फायबर ब्रॉडबॅण्ड, राऊटरही लाँच केला आहे. जिओच्या गिगा टीव्हीमध्ये व्हॉईस कमांड असेल. टीव्हीच्या सेट टॉपबॉक्समध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड आहे.Jio हे भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क आहे, देशाचा प्रत्येक कोपरा सध्या Jio ने जोडला आहे, जियो ‘फिक्सड लाइन ब्रॉडबँड’चं क्षेत्र विस्तारणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

यावेळी मुकेश अंबानी यांनी 2018 हे आर्थिक वर्ष रिलायन्स उद्योग समुहासाठी खास असल्याचं ते बोलले. या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 20.6 % वाढून 36,076 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अंबानी म्हणाले, रिलायन्स जिओचे सध्या साधारण 22 कोटी ग्राहक आहेत. महिन्याला जिओचा 240 कोटी GB पेक्षा जास्त डेटा वापरला जात आहे. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ 2 फोन लाँच केला. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध होईल. जिओ फोन 2 सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात येईल.

 जिओ अॅपद्वारे घरातील सर्व उपकरणं चालणार

आता आपल्या घरातील फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालतील. जिओ स्मार्ट होम सोल्यूशनची सेवा 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याचाच अर्थ तुमच्या घरातील टीव्ही, कॅमेरा, प्लग्ज दरवाजे इत्यादी तुमच्या आवाजानेच कंट्रोल होतील. हे सगळं जिओ अॅपद्वारे शक्य आहे.

  जिओ फोन 2 लॉन्च

रिलायन्सने आज जिओ फोन 2 ही लॉन्च केला आहे. जिओ फोन 2 ची किंमत 2,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही 501 रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन 2 खरेदी करु शकता. 15 ऑगस्टपासून हा फोन मिळेल. Jio फोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप फुकटात उपलब्ध होणार आहे.

महत्त्वाच्या घोषणा

गीगा होम लाँच, फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालणार

रिलायन्स Jio मध्ये यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप फ्री

Jio GIGA TV लाँच, व्हॉईस कमांडवर टीव्ही चालणार

गीगा होम लाँच, फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालणार

आता लवकरच रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला