म्युकरमायकोसिस वाढतोय : मुंबईत आढळले तब्बल १११ रुग्ण

uddhav

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई म्युकरमायकोसिस आजाराचे एकशे अकरा रुग्ण आढळले असल्याची माहिती पुढे आलेली आहे. परंतु यातील बहुतेक रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.

याबाबत अधिकृत माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई शहरात 111 म्युकर मायकोसिस रुग्ण आढळले आहेत. शीव रुग्णालय 32, केईएम रुग्णालय 34, नायर रुग्णालय 38 आणि कूपर रुग्णालय 7 रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. सदर आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. आजार होऊ नये, झाल्यास उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत ट्रीटमेंट प्रोटोकॉल निश्चित केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु केली आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

काय आहे हा आजार? :

म्यूकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार असून, बुरशी हवेतून पसरते. त्याचा संसर्ग झाल्यास नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. अशा व्यक्तींत नाकातून रक्त येणे, चेहरा एका बाजूने दुखणे, मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, एकच दृश्य दोनदा दिसणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. कोव्हिडच्या आजारातून बरे झालेल्यांपैकी काहींना ही लक्षणे दिसल्याने उपचार करावे लागल्याचे डॉक्टरांनी मुंबई, दिल्ली आदी ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

महत्वाच्या बातम्या 

IMP