fbpx

1993 मुंबई स्फोट: सालेमला जन्मठेप, ताहिरला फाशी

वेबटीम-    संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली .यात कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होते. 1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मुस्तफा डोसा, कुख्यात गँगस्टर अबू सालेम, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट या सहा आरोपींना दोषी ठरवलं होतं.

एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती. त्यामुळे आज पाच दोषींना शिक्षा ठोठावण्यात येणार होती.

करिमुल्ला खान ला  जन्मठेपेची शिक्षा तर , दोन लाखांचा दंड.रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरवलं हा आरोप त्यावर लावण्यात आला. हे आरडीएक्स मुंबई स्फोटांसाठी वापरलं गेल. अबू सालेम ला जन्मठेप, दोन लाखांचा दंड, पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातहून मुंबईत पाठवला हा मुख्य आरोप. दोषी फिरोज खानला फाशी.दोषी ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा या बरोबरच रियाज सिद्दीकीला 10 वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली.१ वाजून १० मिनिटांनी कोर्टाची कारवाई पूर्ण झाली.