करमाळा – करमाळा मतदार संघात सध्या शेतीपंपासाठी फक्त दोनच तास वीजपुरवठा केला जात असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रकरणी आता शिवसेनेचे माजी आमदार नारायान पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. महावितरणने तात्काळ आठ तास वीजपुरवठा करणेबाबत आदेश द्यावेत, अन्यथा येत्या शुक्रवारी आंदोलन करणार असल्याचे नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न परवा जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेतही गाजला. सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम माजी आमदार नारायण पाटील यांनी याविरोधात आवाज उठवला व आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याचे जाणवले आणि मा आ पाटील यांनी आपले नियोजित आंदोलन रद्द केले. परंतू महावितरणने अद्यापही उपविभागीय कार्यालयांना, सबस्टेशनला तसे लेखी आदेश न दिल्याने आज मा आ पाटील यांनी आपण शुक्रवारी दुपारी बारा वाजता कुंभेज फाटा चौकात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर करून आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत बोलताना मा आ पाटील म्हणाले की करमाळा मतदार संघातील शेतकरी महावितरणच्या कारभारामुळे त्रस्त झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. वीज बील वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्याची मुस्कटदाबी केली जात आहे. संपुर्ण फिडर व डिपी सोडवले जाऊन ज्यांनी वीज बिल भरले आहे त्यांनाही आज याच कृत्रीम वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला न्याय म्हणता येणार नाही. आणि म्हणून मग शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
जर तात्काळ जेऊर, करमाळा, कुर्डुवाडी व टेंभुर्णी या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयांना सोलापुर जिल्हा अधिक्षक, महावितरण यांनी आठ तास वीजेचे आदेश उद्यापर्यंत दिले नाहीत तर आपले आंदोलन नक्की होणार. कायद्याचा सन्मान राखुन कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने हजारो शेतकरी समवेत घेऊन आम्ही आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्या तरी लोकशाही व सत्याग्रह याचा आदर राखत आम्ही रस्त्यावर उतरु. आज शेतकऱ्याला पोरकेपणाची भावना जाणवत असल्याने करमाळा मतदार संघातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मा आ पाटील यांनी सांगितले तसेच शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नारायण पाटील यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- समीर वानखेडे मुस्लीम नसते तर त्यांचा निकाहच लावता आला नसता – काझी मुज्जमिल अहमद
- मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीकरांना मोफत अयोध्या दर्शन घडवणार