fbpx

MSEB- महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

गेल्या दीड़ महिन्यापासून धायरी,वड़गाव व नर्हे हा भाग सातत्याने अंधारात असतो.या परिसरातील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना  त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत महामंडळाचे अधिकारी या प्रश्नावर गंभीर नसल्याचं चित्र पहायला मिळत होत . तसेच  गेल्या दोन दिवसापासून धायरी भागातील पाणी व वीज पूर्णतः बंद आहे.याचा निषेध म्हणून MSEB चे धायरी भागातील कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडून ताळे ठोकण्यात आले व अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात देऊन आपल्या कामाची जबाबदारी घेत नाही.तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवले. जर MSEB चा कारभार असाच चालू राहिला तर पुढच्या आंदोलनात काळे फासण्यात येईल.असा इशारा यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहाराध्यक्षा  काँग्रेस पुणे रूपाली  चाकणकर यांनी दिला