एम. एस. धोनीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.२०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचे ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं होतं.पण येणाऱ्या सिक्वेलसाठी कोण दिग्दर्शन करणार अजून निश्चित झालं नाही. ‘मिड डे’ या वृत्तपत्रानुसार रोनी स्क्रूवाला या चित्रपटाचे निर्माते असू शकतात.

एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंग धोनीची भूमिका सुशांतसिंग राजपूतने केली होती. या सिनेमामुळे सुशांतसिंग राजपूत प्रकाश झोतात आला होता. अनेक सिनेमाचे रेकॉर्ड ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ याने तोडले होते.विशेष म्हणजे येणाऱ्या सिक्वेल मध्ये सुशांतसिंग राजपूतच धोनीची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात वर्ल्ड कपनंतरचं धोनीचं आयुष्य, आयपीयल सामन्यातील चेन्नई संघाचा विजय या गोष्टी पाहायला मिळतील. महत्वाचे म्हणजे धोनीच्या खेळावर उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हांची या चित्रपटात समावेश केला जाणार आहे.

चेंडूसोबत गैरवर्तणूक पडू शकते महागात ! – आयसीसी

मराठी चित्रपटसृष्टीत जॅान अब्राहमची एन्ट्री…

डॉक्टरांनी एकत्र येत दिला ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश