fbpx

ग्लोव्ह्जसाठी मागितलेली परवानगी ICC ने फेटाळल्यानंतर माहीने उचलले ‘हे’ पाऊल

टीम महाराष्ट्र देशा- इंडियाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्हजवरील पॅरा कमांडोजच्या मानचिन्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आक्षेप घेतला होता. ICC ने यावर आक्षेप घेतल्यानंतर, भारतामध्ये याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. बीसीसीआयने या प्रकरणी धोनीच्या पाठीमागे उभं राहत धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवागी मागितली होती मात्र ICC ने BCCI ची ही मागणी फेटाळली आहे.

धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी आयसीसीकडे कोणत्याही प्रकारची परवानगी मागितली नव्हती. कोणत्याही प्रकारचं चिन्ह किंवा एखादा लोगो घेऊन मैदानात उतरणं हे आयसीसीच्या नियमांना धरुन नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत आपण हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने सांगितले आहे. अशा प्रकारचे ग्लोव्हज वापरल्याने आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर विश्वचषकात हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने बीसीसीआयला सांगितले आहे. बीसीसीआयनंही एक पाऊल मागे घेताना आयसीसीचे आदेश पाळले जातील हे स्पष्ट केले.