धोनीमूळेच आज आपण संघात: कोहली

blank

नवी दिल्ली: धोनी नसता तर, आपण केव्हाच संघाच्या बाहेर असतो. केवळ धोनीमुळेच आपण आज संघात राहिलो असल्याची प्रांजळ कबूली भारताचा नवनियुक्त क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. माझी भारतीय संघातून गच्छंती अटळ होती. पण महेंद्रसिंह धोनी ठामपणे पाठिशी उभा राहिल्यामुळे मला माझे संघातील स्थान टिकवता आले, अशा शब्दांत कोहलीने आपल्या संघातील अस्थित्वाचे श्रेय धोनीला दिले आहे.

कोहली 2008 पासून भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळत आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आंतरराष्ट्रीय डेब्यू केला. तेव्हापासून तो धोनिच्याच नेतृत्वाखाली खेळत आहे. त्याच्या सुरूवातीच्या आर्णि मधल्या टप्प्यातील एकदिवसीय आणि टेस्टमधील कामगिरीकडे लक्ष टाकल्यास त्यात सातत्य दिसत नाही. त्यामुळेच कोहलीचे संघातील स्थान धोक्यात आले होते. मात्र, कर्णधार म्हणून धोनिने आपल्या क्षमतेवर विश्वास दाखवला त्यामुळेच केवळ आपण संघात स्थान कायम ठेऊ शकलो, असे कोहलीने म्हटले आहे.

पूढे बोलताना कोहलीने म्हटले आहे की, सुरूवातीच्या काही काळात धोनिने मला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याने मला अनेक संधी दिल्या. एक क्रिकेटर म्हणून विकसित होण्यासाठी त्याने मला पुरेसा वेळ दिला. अनेकदा संघाबाहेर होण्यापासून वाचवले असे विराटने म्हटले आहे. तर, कर्णधार म्हणून निवड झाल्यावर कोहलीने टि्वट करुन धोनी तू माझा नेहमीच कर्णधार राहशील अशा शब्दात धोनीच्या नेतृत्वाचे शुक्रवारी कौतुक केले होते.