धोनी होणार सचिन, सौरव, राहुल या दिग्गजांच्या यादीत सामील

भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असणारा एमएस धोनी आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट याचे नाते पहिल्यापासूनच काही विशेष. अगदी धोनीच्या कारकिर्दीच्या प्रारंभीपासून या दिग्गजाने यावर छाप सोडली आहे.

परंतु आता हा भारताचा हा सर्वात यशस्वी कर्णधार श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात असा एक विक्रम करणार आहे ज्यामुळे त्याचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दादा सौरव गांगुली आणि द वॉल राहुल द्रविड यांच्या यादीत सामील होणार आहे.

bagdure

धोनीने श्रीलंकेविरुद्ध जर ५७ धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी सचिन, गांगुली, द्रविड पाठोपाठ चौथ्या स्थानी येणार आहे. सध्या धोनीच्या नावावर ९३२२ धावा आहेत तर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर ९३७८ धावा आहेत. विशेष म्हणजे भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील पहिले ५ खेळाडू हे भारताचे कर्णधार राहिले आहेत.

भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
१८४२६ सचिन तेंडुलकर
११२२१ सौरव गांगुली
१०७६८ राहुल द्रविड
९३७८ मोहम्मद अझरुद्दीन
९३२२ एमएस धोनी

You might also like
Comments
Loading...