मुंबई: आयपीएलच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये एमएस धोनी संघर्ष करताना दिसत आहे. त्याने ३० सामन्यांमधून केवळ ३१४ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२० च्या हंगामात त्याने केवळ २०० धावा केल्या, तर पुढचे वर्ष आणखी वाईट होते कारण धोनीने केवळ ११४ धावा केल्या होत्या. गेल्या दोन मोसमात, धोनीने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांसह माजी खेळाडूही त्याच्या फॉर्मबाबत चिंतेत आहेत.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रितेंदर सोढी (ritendar sodhi) वाटते की बॅटसह CSK कर्णधाराचे सोनेरी दिवस आता संपले आहेत. धोनी सहसा सीएसकेसाठी खालच्या क्रमाने फलंदाजी करतो, परंतु त्याच्या फिनिशिंग कौशल्यामुळे, सोढीला वाटते की त्याने वरच्या फळीत फलंदाजी केल्यास सीएसके आणि धोनी दोघांनाही फायदा होईल. “धोनीला वरच्या क्रमवारीत फलंदाजी करावी लागेल कारण तो काही वर्षांपूर्वी जो फिनिशर म्हणून ओळखला जात होता तसा तो आता राहिला नाही. जर त्याने आपला वेळ घेतला, १०व्या किंवा ११व्या षटकात आला, तर तो नंतर चांगली फटकेबाजी करू शकतो. धोनीला (MS Dhoni) माहित आहे की तो सीएसकेची गुरुकिल्ली आहे,”
धोनी काही दिवसात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. २६ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. ज्यात तो सीएसकेचे कर्णधारपद सांभाळेल. सुरत येथे सुरु असलेल्या प्रॅक्टिस कॅम्पमध्ये तो मोठे हिट मारताना दिसत आहे. त्याला नेट मध्ये फलंदाजी करताना पाहून चाहत्यांना अशा आहे की स्पर्धेतही तो अशीच फटकेबाजी करेल.
महत्वाच्या बातम्या
- “प्रतिज्ञापत्रात दोन लग्न झाल्याचा खुलासा करा…”- चंद्रकांत पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला
- चित्रा वाघ आणि संबंधित तरुणीची नार्को टेस्ट करा; कुचिक यांच्या मुलीची मागणी
- काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘Me Too’चा आरोप; पहा काय आहे नेमकं प्रकरण..
- “त्यांनी लग्न करावं, हनिमून करावं…”; एमआयएमने मविआला दिलेल्या ऑफरवर नितेश राणेंची प्रतिक्रिया
- IPL 2022 : केएल राहुलला मोठा धक्का..! ७.५ कोटींची बोली लागलेला खेळाडू संघाबाहेर झाला अन् सोबतच…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<