fbpx

मृण्मयीचा नवा लुक कशासाठी ?

टीम महाराष्ट्र देशा :  नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. सध्या मृण्मयीचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

या व्हायरल फोतोंम्ध्ये मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहे. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या मृण्मयीचा हा नवा लूक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. असे असले तरी मृण्मयी मात्र या नव्या हेअरकटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा हा नवा लूक चाहत्यांना निश्चितच घायाळ करणारा आहे. मृण्मयीने नेहमीच आपल्या सालस सौंदर्यानं आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नव्या हेअरस्टाईलमधून मृण्मयी एका वेगळया भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का? हे येत्या काळातच प्रेक्षकांना कळेल. तोपर्यंत मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल, हे नक्की!