सत्यनारायणाच्या पूजेतील मराठमोळ्या लुकमुळे मिसेस वैद्यने वेधले सर्वांचे लक्ष

दिशा परमार

मुंबई :  ‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाची गेले काही दिवसा पासून चर्चा रंगली आहे. १६ जुलै रोजी राहुल आणि दिशा यांचे लग्न पार पडले. त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल  झाले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वीच दिशाच्या गृहप्रवेशाचे देखील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होते. त्यानंतर आता त्यांचे सत्यनारायण पूजेचे फोटो समोर आले आहे.

सत्यनारायण पूजेमध्ये दिशा आणि राहुलने अस्सल मराठमोळा पेहराव केला होता. दिशाने गुलाबी आणि केशरी अशा रंगसंगतीची साडी नेसली होती. तसेच केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरा माळला होता, गळ्यात मंगळसूत्र आणि काही सोन्याचे दागिने, हातामध्ये चुडा आणि नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ घातली होती. तर राहुलने धोती-कुर्ता घातला होता. हे दोघेजण खूप सुंदर दिसत होते.

मागील काही दिवसांपासून त्यांचे लग्नाआधीच्या काही कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. राहुल-दिशाच्या लग्नानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या लग्नाला काही सेलेब्रिटीनी देखील हजेरी लावली होती.

‘बिग बॉस’च्या घरात दिशा राहुलला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. तेव्हा राहुलने तिला प्रपोज केलं होतं. यामुळे या अजोडीची चांगलीच चर्चा झाली होती, आणि अखेर हे दोघे विवाह बंधनात अडकले आहे. 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दिशा ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

IMP