मराठी सारेगमप लिट्ल चम्पमध्ये होस्ट म्हणून दिसणार मृण्मयी देशपांडे

मृण्मयी

मुंबई : मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे गायिका आणि दिग्दर्शिका आहे. अनेकांच्या मनात तिच्या अभिनयाने तिने आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता मृण्मयी लवकरच छोट्या पडद्यावर मराठी सारेगमप लिट्ल चम्पमध्ये होस्ट म्हणून दिसणंर आहे.

कधीकाळी ही स्पर्धा गाजवणारे आर्या आंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे ज्युरी म्हणून दिसून येणार आहेत. हे काही दिवसांपूर्वीच समजले आणि आता या कार्यक्रमाची होस्ट मृण्मयी असल्याने याला चार चांद लागणार एवढ मात्र नक्की…

मृण्मयीने शास्त्रीय संगीत शिकले असल्याने या सारख्या कार्यक्रमात ती होस्ट म्हणून काम करणार हे खूप चांगले आहे. त्यामुळे तिला होस्टच्या रुपात बघणं खुपचं कौतुकाचं असणार आहे. ती सोशल मीडियावर देखील तिची गाणी चाहत्यांना ऐकवत असते. तिने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक ही केले आहे. आता तिला या नव्या रुपात पाहण्यासाठी अनेकजण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP