राहुल गांधी यांनी कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं- नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा- राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, असं खुलं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पहिल्याच प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली. कर्नाटकमधील चामरानगरमध्ये मोदींनी जनतेशी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी –

‘काँग्रेस अध्यक्षांनी मला आव्हान दिलं होतं. जर ते 15 मिनिटं संसदेत बोलले, तर मी बसू शकणार नाही. त्यांचं बरोबरच आहे. माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस, ज्याला धड चांगले कपडेही घालता येत नाही, तो काँग्रेस अध्यक्षांसारख्या प्रभावी व्यक्तीसमोर बसूच शकत नाही. कारण ते नामदार आहेत, तर मी कामदार. मी तुम्हाला (राहुल गांधी) आव्हान देतो, कर्नाटक सरकारने केलेली चांगली कामगिरी कुठलाही कागद न वाचता 15 मिनिटांत सांगा. हिंदी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत बोला. अगदीच काय मातृभाषेत बोलून दाखवा’.