मुख्यमंत्री महोदय फक्त ‘टूर’ सारखा दुष्काळ दौरा करू नका

uddhav thackeray

सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील नुकसान ग्रस्त भागात जाण्यासाठी दौर्याचे नियोजन केले आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे ते महाले की ‘फक्त टूर सारखे दौरे करू नका. येत्या दोन दिवसात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये मदत जमा नाही केली. तर कोणत्याही मंत्र्यांना, आमदार, खासदारांना किंबहुना मुख्यमंत्र्यांनाही सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही.

तसेच,’अतिवृष्टीमुळे शेतातील उभं पीक आडवं झाल्याचं पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. मंत्र्यांनी पाहणी दौरे करून ही कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने देखील त्यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील काही भागात परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं केलं आहेय. राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, १९ ऑक्टोबरला सोलापूर जिल्ह्यातील नुकसाग्रत भागाचा दौरा करणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीलर रयत क्रांती संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-