jeo bayden

कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे बाईडन दांपत्याने मानले आभार ..

c: नुकत्याच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बाईडन यांना जनतेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी कौल दिला आहे. मात्र प्रचंड गोंधळ झालेल्या या निवडणुकांच्या निकालांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता.

पदभार स्वीकारल्यानंतर जो बाईडन यांच्यासमोर करूनच मोठं आव्हान आहे. त्यामुळे बायडन सत्तेवर आल्यानंतर कोरोनाच्या साठी कोण कोणते उपक्रम राबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुक प्रचारादरम्यान देखील बायडन यांनी नेहमीच कोरोना विषयी खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर देखील बायडन यांनी जनतेला कोरोना विषयी काळजी घेण्याचं आवाहन देखील केला आहे. तर नुकतच जो बाईडन आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जिल बायडन यांनी ट्विटरवरून एका व्हिडिओद्वारे कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर जगातील महासत्ता म्हणून अमेरिका नेहमीच अनेक संघटनांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करत असते. तर महासत्ता म्हणून अमेरिकेचे काही कर्तव्य देखील असतात. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा संघटनांमधील आपला सहभाग काढून घेतल्याचा देखील दिसून आला आहे. यामध्ये पॅरिस हवामान करार आणि जागतिक आरोग्य संघटना या दोन महत्त्वपूर्ण संघटनांमधून अमेरिकेने आपला सहभाग काढून घेतला होता. जो बाईडन यांना निवडून दिले आणि सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत आणि पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ.

महत्वाच्या बातम्या