#MPSC | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू

#MPSC | पुणे : एमपीएस विद्यार्थ्यांच्या आंदोलन विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. यासंदर्भात दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वी आश्वासन देऊनही एमपीएससीची परीक्षा पद्धती बदलली नव्हती. त्यामुळे पुण्यातल्या परीक्षार्थींना पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते.

नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू

एमपीएससीने एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी, आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्यात येईल असे एमपीएससीने सांगितले आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार मानले आहेत. “विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्या प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला या प्रकरणात राजकीय श्रेय घ्यायचे नव्हते. मात्र काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Exit mobile version