‘MPSC’चा निकाल जाहीर, चौगुले पहिला तर शेतकरी पुत्र दादासाहेब दराडेची गरुडझेप

dadasaheb darade mpsc

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.

MPSC-Result-1

पूर्व परीक्षेनंतर निश्चित झालेल्या उमेदवारांची अंतिम परीक्षा १३ जुलै ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १,३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले.

महाराज खासदार झाले ! ज्योतिरादित्य सिंधियांचा दणदणीत विजय

एमपीएससीच्या निकालानंतर उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून १० दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान तर लांबच आधी मुंबईत पुढचा महापौर बसवून दाखवा – नितेश राणे