एमपीएससी : राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन; राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय

mpsc

मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सारासार विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले आणि एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला मात्र आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन,कम्युनिकेशन गॅप,आपापसातील मतभेद या सर्व बाबींमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे.

या सगळ्या परिस्थितीवर अहमदनगरचा शुभम पाटील म्हणतोय की’आधी परीक्षा घेऊन घ्यायला पाहिजे होती.मग ते कोर्ट आणि इतर गोष्टी सरकारने करायला पाहिजे होत्या. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे मानसिक ताण येऊ लागला आहे’.तर जळगावचा अक्षय देशमुख म्हणतो ‘ गेली आठ वर्ष झाली अभ्यास करतोय हा शेवटचा अटेंप्ट द्यायचा होता.पण शेवटी आले माय – बाप सरकारच्या मना तेथे कोणाचे चालेना. आता तर वय देखील हातात राहिले नाही असे वाटतंय’.

महत्वाच्या बातम्या