टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) सातत्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. राज्यसेवा, गट ब आणि गट क पदांसाठी भरती प्रक्रिया घोषित झाल्यानंतर आता MPSC ने आणखीन काही पदांची भरती घोषित केली आहे. मोठ्या प्रमाणात पदांची रिक्तता देखील यासाठी कारणीभूत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वन विभाग, कृषी, पशुसंवर्धन विभाग, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग आणि जलसंपदा विभागातील विविध श्रेणीच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या सर्व विभागांमधील एकुण 378 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
विविध पदांच्या 378 जागा
वनक्षेत्रपाल पदाच्या १३ जागा, कृषी विभागातील उपसंचालक पदाच्या ४१ जागा, तालुका कृषी अधिकारी पदाच्या १०० जागा, कृषी विभागातील कनिष्ठ व इतर अशा ६५ जागा, जलसंपदा विभागातील सहाय्यक स्थापत्य अभियंता पदाच्या १०२ जागा, सहाय्यक अभियंता विद्यूत व यांत्रिकी पदाच्या ४९ जागा अशा जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. तरी शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख
३० सप्टेंबर २०२२ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
संबंधित पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारिख ही २३ ऑक्टोबर २०२२ ही असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amit Thackeray | कोणचा दसरा मेळावा पाहिला?, अमित ठाकरे म्हणाले…
- New Car Launch | Mahindra ची ‘ही’ कार होणार आज लाँच
- Chandrakant Patil | “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही”
- Google Smartphone Launch | Google ने लाँच केले ‘हे’ नवीन स्मार्टफोन
- Prakash Ambedkar | “पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही, पण…”; प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका