एमपीएससी’ची जाहिरात, मराठा समाजासाठी पहिल्यांदाच राखीव जागा

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 342 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण जाहीर केले होते. त्यामुळे सरकारने नुकतीच मेगाभरती जाहीर केली आहे.

या मेगाभरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, हे सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आता जाहीर झालेल्या एमपीएससी जाहिरातीमध्ये मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवल्या आहेत. सध्या सरकारने एकूण 342 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी पदासाठी 4 जागा, पोलिस उप अधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदासाठी 3, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) 1, तहसिलदार 6, उपशिक्षण अधिकारी 2 अशी पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

सध्या सरकारने एकूण 342 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी पदासाठी 40 जागा, पोलिस उप अधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदासाठी 34, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) 16, तहसिलदार 77,उद्योग उपसंचालक 2,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 3,कक्ष अधिकारी 16,नायब तहसीलदार 113,उद्योग अधिकारी 5,सहाय्यक गटविकास अधिकारी 11, उपशिक्षण अधिकारी 25 अशी पदे असणार आहेत.सर्व जिल्ह्यांची मागणी पत्रके आल्यानंतर या जागा वाढण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...