एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी राज ठाकरेंनी केला मुख्यमंत्र्यांना फोन

raj thackeray

मुंबई : राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला आहे. दरम्यान राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा तसेच एमपीएससीच्या उमेदवारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोणाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

सर्वपक्षीय नेते आता परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला पाठींबा देत असून एमपीएससीच्या उमेदवारांच्या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक निर्णय घेवू असे म्हटल्याचे देखील सांगितले आहे.

राज ठाकरे यांच्या सोबतच,खासदार नवनीत राणा कौर,राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘सध्याची करोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो’. असे ट्विट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :