एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद: लॉकडाऊनमुळे एमपीएससीचे सर्व क्लासेस, अभ्यासिका व बाहेरगावच्या विद्यार्थीयांचे मेस बंद असल्याने तसेच अनेक विद्यार्थीयांना कोरोना विषाणुची लागण झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहु नये म्हणून दिनांक ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्यात यावी. त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून वयोमर्यादा वाढवण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या मागणी नंतर औरंगाबादेत पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वेळी एमपीएससीची परीक्षा सरकारने पुढे ढकल्यामुळे मोठा गदारोळ माजला होता, त्यावेळी स्वतः विद्यार्थी रस्त्यावर येत परीक्षा घेण्याची मागणी करीत होते. पण यावेळी चित्र उलट आहे, काही परीक्षार्थीनी परीक्षा रद्द करावी अशी मागणी करत सरकारला पेचात टाकले आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी उडी मारल्याने राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इम्तियाज जलील आणि शिवसेना त्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे संबंध सर्व श्रुत आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी केलेल्या ट्विटमुळे परीक्षा रद्द होणार की, नाही ते सांगणं अवघड असलं तरी यावर औरंगाबादचे राजकारण पेटणार हे मात्र नक्की असल्याचे मानल्या जात आहे. येणाऱ्या काळात याचे परिणाम काय होता हे बघावे लागेल.

महत्वाच्या बातम्या