मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सारासार विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले आणि एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला मात्र आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
तर, मंत्री छगन भुजबळ व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या परीक्षा पुढे ढकलण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडं, ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहावं, मेगा भरतीसह स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात यासाठी रस्त्यावर उतरला. आता, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी या परीक्षांबाबत महत्वाचा दावा केला आहे.
“मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या विषयावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी या विषयी चर्चा केली. येत्या दोन ते तीन दिवसांत एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर होईल,” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकते’; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
- ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे’; राष्ट्रवादीत परतल्यानंतर गायकवाडांची गर्जना
- ‘दानवे खासदार असल्याचं माहित आहे पण त्यांना ज्योतिषशास्त्र देखील कळतं याची कल्पना नव्हती’
- प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नाही : पाटील
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी