एमपीएससीचं ठरलं ! ‘या’ तारखेला होणार राज्यातील सहा केंद्रांवर मुख्य परीक्षा

mpsc

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या. यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांनी तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर झाली असून 4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी होणार असल्याचं राज्य लोकसेवा आयोगाने सांगितले आहे. अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

या मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाईल. मुख्य परीक्षांसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 14 सप्टेंबर 2021 पासून ते 28 सप्टेंबर 2021 पर्यंत असणार आहे.

उद्या दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :