पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला खासदार काकडे गैरहजर, गैरहजेरीच कारण काय ?

sanjay kakde

टीम महाराष्ट्र देशा –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन झाले. मात्र भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे हे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मात्र राजकीय चर्चाना तोंड फुटले आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागे कार्यक्रम  पत्रिकेत नाव नसल्याने कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनाही निमंत्रण नव्हते. त्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने याचा निषेध देखील केला आहे. मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण नसल्याने त्यांची देखील नाराजी असल्याची चर्चा होती.  काही दिवसापुर्वीच संजय काकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत दिसले होते. आजच्या त्यांच्या अनुपस्थितीमुळे नव्या चर्चेला सुरुवात  झाली आहे.

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...