आपण घाबरतो तर फक्त……; राजकारणात सर्वाना घाम फोडणारे खा उदयनराजे कोणाला घाबरतात ?

सातारा: मी लोकांची काम करतो त्यामुळेच कॉलर उडवतो, म्हणत खा उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाना साधला आहे.

माझ्या पोटात एक आणि ओठात एक अस नसत, मी हे केलं आणि तसं केल म्हणत फालतुगिरी करू नका, त्यांच्या संकुचित बुद्धीला व्यापकता कधी येणार याची वाट पाहत असल्याच म्हणत खा उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

bagdure

काल साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून करण्यात येणाऱ्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.

आपण नसतो तर साताऱ्यातील अनेक सरकारी कार्यालय बारामतीला गेली असती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना सातारा नाही तर बारामती जिल्हा करायचा होता अशी टीकाही उदयनराजे यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. आमच्या तोंडातील घास हिसकावला जात असेल तर मी गप्प बसणार नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, राजकारणात सर्वाना घाम फोडणारे खा उदयनराजे यांनी आपण केवळ साताऱ्याच्या राजकारणातील बहुरंगी व्यक्तीमत्व असणारे अभिजीत बिचुकलेलाच घाबरत असल्याच सांगितल आहे.

You might also like
Comments
Loading...