संभाजीराजे-उदयनराजे भेट लांबणीवर, उदयनराजे म्हणतात…

samhabjiraje uadaynraje

पुणे : खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या प्रश्नांवर आणि प्रस्तावित मोर्चाच्या संबंधित संभाजीराजे हे खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात आज ( शुक्रवार ११ जून ) भेट घेणार होते. मात्र ही भेट पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

मात्र, उदयनराजे भोसले यांनी आपण लवकरच संभाजीराजे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. संभाजीराजे आणि मी भाऊ आहोत. मी प्रत्येक कार्यात त्यांच्यासोबत आहे. माझी कामं आटोपल्यानंतर दोन-तीन दिवसांत मी संभाजीराजे यांना भेटेने, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

IMP