‘चांद्रयान 2’चे यशस्वी प्रक्षेपण, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे उदयनराजेंकडून कौतुक

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान 2’ चे आज श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण झाले आहे. दुपारी 2:43 वाजता ‘चांद्रयान 2’ झेपावले आहे. भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान 2’ चे आज श्रीहरीकोठा येथून प्रक्षेपण झाले आहे. दुपारी 2:43 वाजता ‘चांद्रयान 2’ झेपावले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे 15 जुलैला होणारे ‘चांद्रयान 2’ चे प्रक्षेपण रद्द झाले होते. मात्र आता सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे ‘चांद्रयान 2’ झेपावले.

भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनंदन, भारतीय शास्त्रज्ञांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, अशा आशयाचे ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या हेलियम टाकीतील दाब कमी झाल्याने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द करण्यात आले होते. चेन्नई विमानतळावर इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणाले, की तांत्रिक दोष आढळल्याने ‘चांद्रयान-२’चे उड्डाण रद्द केले होते. आता त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या असून अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात तांत्रिक बिघाडाची शक्यता नाही.

दरम्यान ‘चांद्रयान 2’ भारताची महत्वकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेमध्ये ‘चांद्रयान 2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणार आहे. तसेच सजीव सृष्टीस आवश्यक असणाऱ्या पाण्याचा देखील शोध घेणार आहे. उड्डाणानंतर मोहिमेचे १५ टप्पे असून त्यात ४५ दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या १५ मिनिटांत ‘चांद्रयान-२’ तेथील दक्षिण ध्रुवावर गिरक्या घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद अवतरण करील.