सुजय विखे आणि उदयनराजेंनी घेतली इंग्रजीतून शपथ  

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं पहिलं अधिवेशन सुरु झालं असून, पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीत राज्यातील खासदार कोणत्या भाषेत शपथ घेणार याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले तर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी इंग्रजीतून शपथ ग्रहण केली आहे.

नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीत महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी आणि संस्कृतमध्येही शपथग्रहण केलं. विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठीतीतून तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून शपथ घेतली.Loading…
Loading...