‘मला मुख्यमंत्री करायंचच होते तर पंधरा वर्षांपूर्वी करायचे होते’

udyan raje bhosale1

टीम महाराष्ट्र देशा : मी मुख्यमंत्री व्हावे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु चार भिंतीच्या आत काम करायला मी काय कारकून आहे का? जे मला जमणार नाही ते मी करणारही नाही. मला जर मुख्यमंत्री व्हायचे असते तर तसे प्रयत्न मी केव्हाच केले असते आणि जर मुख्यमंत्री करायंचच होते तर पंधरा वर्षांपूर्वी करायचे होते. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात आमचच सरकार होते असं म्हणत राष्ट्रवादीला घरचा आहेर खा. उदयनराजे भासले यांनी दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी विविध मुद्द्यांवर रोकठोक मते व्यक्त केली. नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. स्वतःला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना काहीच काम केले नाही. मंत्रीपदी असताना लाल दिव्याच्या गाडीचा वापर फक्त लोकांना हिणवण्यासाठी केला, त्यांना आता देवसुद्धा क्षमा करणार नाही असे सांगत भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!